मंजू बालाच्या कांस्य पदकाचे रूपांतर ‘रौप्य’ पदकात !

manju-bala
इंचियोन – आशियार्इ खेळात भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती चीन खेळाडू झांग वेइनशिउ डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने तिचे पदक काढून घेण्यात आले आहे. त्याचा फायदा भारताच्या कांस्य पदक विजेती मंजू बालाला झाला आहे आणि त्यामुळे तिच्या पदकाचे रूपांतर रौप्य पदकात झाले आहे. अंतिम सामन्यात मंजूपेक्षा आघाडीवर असलेल्या दोन्ही खेळाडू चीनच्या होत्या. त्यातील एक खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळली. ऍथलेटिक्सच्या तांत्रिक अधिका-यांनी सूचित केल्यानंतर भारतीय दलातील एका अधिका-यांनी सांगितले की, मंजू बालाचे पदक कांस्य पदकातून रूपांतरित करून रौप्य करण्यात आले आहे. कारण, तिच्याहून आघाडीवर असलेली चीनची ऍथलीट डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. २८ सप्टेंबरला मंजूने ६०.४७ मीटर अंतरावर भाला फेक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले होते. तर, चीनची खेळाडू झांग वेइमशिउने ७७.३३ मीटर अंतरासह सुवर्ण आणि वांग झेंगने ७४.१६ मीटरसह रौप्य पदक पटकाविले होते.

Leave a Comment