नियतीशी माझी लढाई – पंकजा मुंडे

pankaja
अहमदनगर – भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी माझी लढाई कोणत्याही पक्षाशी नसून नियतीशी आहे असे म्हणत मतदारांना अंर्त साद घातली. आज भगवानगडमधून पंकजा यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजाच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी समाजाने एकत्र यावे असे आवाहन अमित शाह यांनी केले. गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजाला साथ द्या. त्या ओबीसी समाजाचे नेतृत्व उत्तम करू शकतील असे म्हणत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केले.

Leave a Comment