आदित्य ठाकरेंनी डागली भाजपवर टीकेची तोफ

aditya
मुंबई – शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला असून, भाजपला तरुणांबद्धल आदर नाही असे म्हणत भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

शिवसेना या निवडणुकीत स्वबळावर आपले सरकार बनवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर, महाराष्ट्राचेतुकडे पाडण्यासाठी युती तोडली असेल तर गाठ शिवसेनेशी आहे असा सज्जड दमच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला भरला आहे.

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. यावेळी शिवसैनिकांच्या उपस्थित शस्त्र पूजन करण्यात येणार तसेच बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Leave a Comment