सीरियात शाळेत स्फोट; ४१ विद्यार्थ्यांचा मृत्यू

blast
दमिश्क – सीरियाच्या होम्स शहरातील बशर सरकारच्या नियंत्रणात असलेल्या शाळेच्या इमारतीत दोन जोरदार स्फोट झाले. या स्फोटात ४१ विद्यार्थ्यांसह एकूण ४८ जण ठार झाले असून ७४ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिस सूत्राकडून मिळाली आहे.

होम्स शहरातील ‘अकराम अल -मख्जूमी ’ शाळेत दोन स्फोटात ४१ विद्यार्थी ठार झाले आहेत. अनेक मुले अजूनही बेपत्ता झाल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये चार नागरिक आणि तीन सैनिक होते.

अधिकार्‍यांनी सांगितले की, अकरिमा भागामध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर एका मोटारीने पेट घेतला. यावेळी दोन स्फोट एका मागोमाग झाले. शाळा सुटल्यानंतर काही वेळातच हे स्फोट झाल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला.

Leave a Comment