भारतीय खेळाडूंनी दसऱ्या आधीच लुटले सोने; रिलेमध्ये देखील सुवर्ण

inchone
इन्चिऑन : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आज भारताच्या महिला धावपटूंनी देखील सोने लुटले असून फोर बाय फोर हंड्रेड मीटर रिले शर्यतीत प्रियांका पवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि एमआर पूवम्मा या चौघींनी नव्या विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.

ही शर्यत तीन मिनिटे काही सेकंदांत भारतीय महिलांनी पूर्ण केली असून आशियाई क्रीडा स्पर्धेमधली महिलांच्या रिले शर्यतीतली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

Leave a Comment