मेरी कोमचा आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्डन ‘पंच’

mary-kom
इंचेऑन – भारताची अव्वल महिला बॉक्सर एम.सी.मेरी कोमने आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी गोल्डन पंच लगावत भारताच्या खात्यात सातव्या सुवर्णपदकाची नोंद केली.

मेरीने कझाकिस्तानच्या झैना शेखरबेकोव्हा विरुध्दचा सामना २-१ ने जिंकला. पहिल्या राऊंड गमावल्यानंतर मेरीच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. मात्र नंतरच्या दोन फे-यांमध्ये मेरीने आपली कामगिरी उंचावत सुवर्णपदक पटाकवले. ३१ वर्षीय मेरीने या सामन्यात वेग आणि तंत्राच्या बळावर प्रतिस्पधी झैनाला निष्प्रभ केले.

मंगळवारी मेरीने उपांत्यफेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या ली थी बँगला पराभूत केले होते. पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावणा-या मेरीने २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कास्यंपदक पटकावले होते.

Leave a Comment