राज ठाकरेंनी घेतला आघाडीच्या नेत्यांचा समाचार

raj
वलगाव – राज ठाकरेंनी दर्यापूरपाठोपाठ अमरावतीतील वलगावमध्ये दुसरी प्रचार सभा घेतली असून याठिकाणी विदर्भातील सर्व नेत्यांवर राज यांनी चौफेर टीका केली. दर्यापूरमध्ये मुख्यमंत्र्यांना बुजगावणे म्हणणा-या राज ठाकरेंनी वलगावमध्ये उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. पोलिस भरतीत मुलांची छाती, उंची मोजता यांच्या उंचीचे काय? असे राज ठाकरे म्हणाले.

विदर्भातील अनेक नेत्यांचे देशावर सत्ता गाजवणा-या घराण्याशी जवळचे संबंध होते तरी त्यांना विदर्भाचा विकास करता आला नाही अशा शब्दांत राज ठाकरेंनी नेत्यांवर टीका केली. दरम्यान, राज यांनी पुन्हा एकदा या सभेत परप्रांतीयांना भाषणातून लक्ष्य केले.

राज यांनी यावेळी वेगळ्या विदर्भाची मागणी करणा-यांवरही टीका केली. विदर्भ वेगळा द्या आम्ही विकास करून दाखवतो म्हणणा-यांना एवढे दिवस का विकास करता आला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी व्यक्त केला. विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाचा विकास होऊ दिला नसल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी म्हटले आहे. सगळे नेते निवडणुकीच्या तोंडांवर सगळे नेते समोर येतात, आश्वासने देतात, पण ती पूर्ण कशी करायची याचे उत्तर माझ्याकडे आहे. कारण विकासाचा आराखडा मी तयार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment