आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघ

hockey
इंचियोन : तब्बल १२ वर्षानंतर भायतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून भारतीय हॉकीसंघाने दक्षिण कोरियाला उपांत्यफेरीत १-०ने धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दोन्ही संघाला सामन्याच्या दोन हाफमध्ये एकही गोल करण्यात यश मिळाले नाही. पण तिस-या हाफ संपायला एक मिनीट बाकी असताना भारताकडून आकाशदीप सिंहने एक गोल करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. फायनलमध्ये भारताची लढत पाकिस्तान आणि चीन यांच्यातील जो संघ जिंकेल त्यांच्यासोबत होणार आहे. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकल्यास रिओ ऑलिम्पिकमध्ये भायतीय संघाचा प्रवेश निश्चित होणार आहे.

Leave a Comment