गुरुवारपासून बॅंकांना सलग पाच दिवस सुट्या

banking
मुंबई – बॅंकांच्या व्यवहार अर्धवार्षिक कामकाज पूर्तता (हाफ ईयर क्लोजिंग) आणि सलग आलेल्या पाच सुट्यांमुळे थंडावणार असून ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर या दोन दिवसांत बॅंकांचे कर्मचारी हाफ ईयर क्लोजिंगचे काम करणार आहेत. तसेच बॅंकाना पुढील तीन दिवस सलग सुट्या आल्यामुळे पेंशन, एटीएम, चेक क्लिअरिंग प्रणालीवर विपरित परिणाम होऊन ग्राहकांना त्यांचा भुर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, तीनला दसरा, पाचला रविवार तर सहाला (सोमवार) शासकीय सुट्यामधील बकरी ईदची सुटी आहे. याचबरोबर चार ऑक्टोबरला शनिवार असल्याने बॅंका अर्धादिवस सुरु राहातील. पाच दिवस सुट्टी असल्याने एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो. त्यात दसरा आल्याने एटीएममधून जास्त पैसे काढले जातात. त्यामुळे आपल्याला लागणारे रुपये आजउद्यामध्ये एटीएममधून काढून घेणे योग्य ठरेल.