आठवलेंचे उध्दव ठाकरेंवर शिरसंधान

ramdas
मुंबई : भाजपला पाठींबा दिल्यानंतर शिवसेनेबाबत सावध भुमिका घेणा-या रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेत उध्दव ठाकरे आमचा पक्ष फोडत असल्याचे शिरसंधान केले आहे.

भाजपसोबत जाण्याचा आठवले यांचा निर्णय रिपाइंच्या अनेक कार्यकर्त्यांना पटला नसल्यामुळे पक्षात फुट पडली असून अर्जून डांगळे व काकासाहेब खंबाळकर या दोन बडय़ा नेत्यांनी ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठींबा शिवसेनेला असल्याचे जाहीर केल्यामुळे संतप्त झालेल्या आठवले यांनी उध्दव यांच्यावर पक्ष फोडत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घेतला असून महत्त्वाचे म्हणजे अपणांस भाजपसोबत जाण्यास डांगळे यांनीच सुचवले होते आणि आता तेच शिवसेनेसोबत गेले आहेत. मुंबई महापालिकेत शिवशक्तीने भिमशक्तीला साथ दिल्यामुळेच सत्ता आली असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

Leave a Comment