मुलायमसिंह झाले डॉक्टर

mulayam
लखनऊ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांना डॉ. शकुंतला देवी मिश्रा पुनरुद्धार विश्वविद्यालयाची मानद डॉक्टरेट पदवी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत देण्यात आली. उच्च शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी असलेले अखिलेश विश्वविद्यालयाचे चेअरमन आहेत. तसेच मुलायमसिंह यांच्या नावाने विश्वविद्यालयाच्या काऊन्सीलने दोन गोल्ड मेडल सुरु करणार असल्याचे सांगितले.

प्रमुखअतिथी म्हणून आलेले मुलायमसिंह यांना राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते विश्वविद्यालयाच्या दिक्षांत समारोहात डॉक्टरेट बहाल करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अखिलेश यांनी संगीतकार रविंद्र जैन आणि यश भारती पुरस्कार सुरु करणार असल्याचे जाहीर केले.

Leave a Comment