राखी सावंतची राज ठाकरेंवर आगपाखड

rakhi
मुंबई – वाद-विवाद हा अभिनेत्री राखी सावंतच्या पाचवीलाच पुजला आहे. याचा प्रत्यय पुन्हा आला तो मुंबईच्या पत्रकार परिषदेत. रिपाईच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि अभिनेत्री राखी सावंतने मराठी माणसाच्या नावाने आपले दुकान चालविणा-या राज ठाकरे यांच्या नावासमोरचे ‘ठाकरे’ आडनाव काढले तर राज ठाकरे यांना कोणीही ओळखणार नाही. नक्कल करण्याची जर एवढी आवड असेल तर राजकारण सोडून चित्रपटात काम करावे, अशी आग पाखड या परिषदेमध्ये केली. उपमुख्यमंत्रिपदावरून रामदास आठवले यांची मुंबईतील एका सभेमध्ये राज ठाकरे यांनी खिल्ली उडविली होती. त्याला राखी सावंतने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले.

रिपाई हा छोटा पक्ष असला तरी भाजपसारख्या मोठय़ा पक्षासोबत गेल्याने विविध पदे मिळवणार असल्यामुळे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबले आहे. यावेळी राखीने राज आणि अजित पवार यांच्यावर टीका केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलणे टाळले. अजित पवार यांना राज्यातील जनता धरणाच्या भाषेमध्येच धडा शिकविणार आहे. मराठी माणसाच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा रोजगार, घरे आणि त्यांचे राहणीमान कसे सुधारेल यावर राजकीय नेत्यांनी जास्त लक्ष दिले पाहिजे, असे मत राखीने व्यक्त केले.

Leave a Comment