भाजपाने घेतला आबांच्या उमेदवारीवर आक्षेप

patil
सांगली : भाजपा कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या उमदेवारी अर्जावर आक्षेप घेतला असून बेळगावात दाखल असलेल्या गुन्हयाचा उल्लेख पाटील यांनी उमदेवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला नसल्याने निवडणुक अधिका-यांनी त्यांचा अर्ज तुर्तास बाजूला ठेवला असल्यामुळे पाटील यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

सांगली जिल्हयातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी तर्फे आर. आर. पाटील यांनी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जाची आज छाणणी सूरू आहे. या वेळी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्याने आबांच्या उमदेवारी अर्जावर आक्षेप घेतला. आबांनी उमदेवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेळगावात दाखल असलेल्या गुन्हयाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असा भाजपा कार्यकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे अर्ज छाणणीत निवडणुक निर्णय अधिकाऱयांनी आबांचा अर्ज तुर्तास बाजूला ठेवला असल्याचे समजते. यामुळे आबांची उमदेवारी अडचणीत आली आहे.

Leave a Comment