अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष पदी अश्रफ घनी विराजमान

ghani
काबूल – सोमवारी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची अश्रफ घनी अहमदझाई यांनी शपथ घेतली. अश्रफ घनी यांनी हमीद करझाई यांची जागा घेतली असून, २००१ नंतर अफगाणिस्तानमध्ये प्रथमच लोकशाहीमार्गाने सत्ताबद्दल झाला आहे.

गेले सहा महिने अफगाणिस्तानच्या विविध प्रांतात राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूकप्रक्रिया सुरु होती. २००१ पासून अफगाणिस्तानची सूत्रे हमीद करझई यांच्याकडे होती.

सोमवारी घनी यांच्याबरोबर दोन उपाध्यक्षांचाही शपथविधी झाला. जवळपास १४०० मान्यवर या शपथविधी सोहळयाला उपस्थित होते. अमेरिका, चीन, पाकिस्तान, भारत आणि अन्य देशांचे दोनशे प्रतिनिधी या शपथविधी सोहळयामध्ये सहभागी झाले होते.