थंडावली ठाण्यातील बंडाळी

anant-tare
ठाणे – निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपमध्ये गेलेले शिवसेना नेते अनंत तरे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला असून तरे यांनी वेळेत एबी फॉर्म न भरल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

बंडखोर शिवसेना नेते अनंत तरे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आवश्यक असलेल्या एबी फॉर्मची मूळ प्रत न जोडल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तरेंचा अर्ज फेटाळला गेल्याने शिंदेच्या विरोधातील बंडाळी थंडावली आहे.

ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून अनंत तरेंनी अर्ज दाखल केला होता. याच मतदारसंघातून तीन वेळ पासून सेनेचे एकनाथ शिंदे हे निवडून येत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हासंपर्क एकनाथ शिंदे हे तब्बल ३३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.