दीपक मानकरच असतील पुण्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार

mankar
पुणे – आता दीपक मानकर हेच पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात असून राष्ट्रवादीकडून अंकुश काकडेंनीही उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांनी प्रतिज्ञापत्र वेळेत सादर न केल्याने त्यांची उमेदवारी फेटाळण्यात आली आहे.

पक्षातर्फे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या दीपक मानकरांना उमेदवारी दिल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागेल कि काय अशी राष्ट्रवादीला भीती होती. त्यामुळे राष्ट्रवादीने आधी अंकुश काकडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दीपक मानकर यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला.

पण अर्ज दाखल करताना ऐनवेळी वीज गेल्याने काकडेंना प्रतिज्ञापत्रच सादर करता आले नाही. यामुळे आता दीपक मानकर यांनाच राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे.

विशेष म्हणजे राज्यातील वीज खाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच ऐनवेळी वीज गेल्याचा त्याचा फटका बसला आहे. आता ही वीज गेली की घालवली अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.

Leave a Comment