शिवसेना, भाजपला पून्हा एकत्र आणणार आठवले

ramdas
मुंबई – आज शिवसनेने आपल्या सामना या मुखपत्रातुन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर टीकेची झोड उडवली असून मात्र, आठवले यांनी या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळत, शिवसेना, भाजपला पून्हा एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भाजपने दाखवलेल्या केंद्रातील मंत्रीपदाच्या ऑफरला आठवले भुलले आहेत. प्रत्यक्षात मात्र, भाजप त्यांना अमिष दाखवण्याशिवाय काहीच देणार नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे. भाजपला आठवलेंची सोबत नको असताना शिवसनेने त्यांना सोबत घेतले.

आठवलेंनी जरी साथ सोडली असली तरी आंबेडकरी जनता महाराष्ट्रहितासाठी शिवशक्तीबरोबरच राहणार आणि तसं वातावरण सर्वत्र दिसत असल्याचे सामनाने म्हटले आहे.

शिवसेनेच्या या जाहीर टीकेला आपण कोणतेही प्रत्युत्तर देणार नसल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे. निवडणूकी नंतर सेना आणि भाजपला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे आठवले यांनी सांगीतले.

शनिवारी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी रामदास आठवलेंवर टीका केली. या टीकेला आठवले यांनी चोख प्रत्युत्तर दिले. नाशिकची सत्ता मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकचे सोनं केले की कोळसा हे सगळ्यांनीच बघीतले असल्याचे आठवले म्हणाले.

Leave a Comment