कविता करकरे यांचे उपचारादरम्यान निधन

kavita-karkare
मुंबई – शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता यांची प्राणज्योत मालविली आहे. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

कविता यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांना माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांनी म्हटले होते. मात्र आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

प्रसिद्ध डॉक्टर बी. के. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे एक पथक कविता यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. तसेच कविता या कोमात गेल्याने डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले आहे. कवितांच्या कुटुंबियांनी त्यांच्या देहदानाचा निर्णय घेतला आहे.