भावाला उमेदवारी देण्यासाठी निष्ठावंतांचे कापले पत्ते

sanjay-raut
मुंबई – पुन्हा एकदा भावाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी निष्ठावंतांचे पत्ते कापले. मागील निवडणुकीत भांडुपमधून सुनील राऊत यांना शिवसेनेकडून उमेदवारी देत कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेणा-या राऊतांनी यंदा भावाला विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिल्यामुळे माजी महापौर दत्ता दळवी यांचा पत्ता कापला गेला.

गेल्या निवडणुकीत भांडुपमध्ये पत्ता कापलेल्या रमेश कोरगावकर यांना यंदाही उमेदवारी मिळाली नाही. येथे राऊतांनी त्यांचे समर्थक अशोक पाटील यांना उमेदवारी दिल्याने भांडुप आणि विक्रोळी मतदारसंघात राऊतांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रीय होऊ लागले आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर या त्रिकुटामुळे संजय राऊतांना लांब ठेवले जात असले, तरी विधानसभेच्या प्रचारसभेत त्यांनी भाषण करून आपले स्थान असल्याचे दाखवून दिले.

परंतु प्रत्यक्षात लोकांमधून निवडून येण्याची कुवत नसलेल्या राऊतांचा भांडुप आणि विक्रोळीच्या राजकारणातील हस्तक्षेप वाढतच असून त्यामुळे या भागांतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरत आहे. शिवसेना नेते अ‍ॅड. लिलाधर डाके यांच्यापेक्षा राऊतांची दादागिरी येथील मतदारसंघात चालत असल्याचे दिसून येत आहे.

काबूलमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळयाच्यावेळी कुठलीही अप्रिय़ घटना घडू नये यासाठी अत्यंत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काबूलकडे जाणा-या सर्व गाडयांची कसून तपासणी करण्यात येत होती. अफगाणिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या शांततेने सत्ताबद्दल झाला आहे.

Leave a Comment