विराट कोहली झाला गोवा फुटबॉल टीमचा मालक!

virat-kohli
गोवा : देशातील बहुचर्चित फुटबॉल लीग टूर्नामेंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)शी भारत स्टार क्रिकेटर विराट कोहली हा जोडला गेला असून आयएसएलच्या गोवा फ्रेन्चायझीचा कोहली हा सहाय्यक मालक आणि अम्बेसेडर असणार आहे.

१२ ऑक्टोबरला आयएसएलची पहिली टूर्नामेंट सुरू होणार असून २० डिसेंबरपर्यंत ही टूर्नामेंट चालणार आहे. ‘मी आयएसएल फ्रेन्चायझीसाठी खूप उत्सुक असल्यायामुळे भारतात फुटबॉलच्या विकासाला चालना मिळणार आहे’, असे यावेळी कोहली म्हणाला.

गोवा एफसी हे आगामी आयएसएल टूर्नामेंट सर्वांसाठी मोठे आवाहन असणार आहे. आंतरराष्ट्रीय दिग्गज फुटबॉल खेळाडूंच्या अनुभवाचा टीमसाठी खूप मोठा फायद होईल, असेही यावेळी तो म्हणाला.

एफसी गोवाने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉल खेळाडू जिकोला याला मुख्य कोच बनवले आहे. एफसी गोवा १६ ऑक्टोबरला चेन्नईच्या विरुद्ध आयएसएलमध्ये त्यांच्या सामन्यांपासून त्याचे आगमन होईल, असेही विराट यावेळी बोलत होता.

Leave a Comment