मुख्यमंत्री हा ठाकरे घराण्याचाच हवा – नांदगावकर

bala-nandgaokar
मुंबई : मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठाकरे घराण्याचाच होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज ठाकरे यांचे भाचे निशांत देशमुख यांनी फेसबुकवर ‘आता फक्त ठाकरे अधिक ठाकरे सरकार’ अशी पोस्ट केल्याने शिवसेना-मनसे युतीची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य पालिकांतील सत्ता टिकवायची असेल, तर शिवसेनेला मनसेची गरज लागणार हे स्पष्ट दिसत आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने पाठिंबा काढून घेतला तर मनसेच्या मदतीने ही सर्वात मोठी महापालिका शिवसेना राखू शकते. त्यामुळेच शिवसेना-मनसेच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

Leave a Comment