भारताने केला पंतप्रधान शरीफ यांच्या वक्तव्याचा निषेध

nawaz
संयुक्त राष्ट्रसंघ – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत जम्मू-काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र निषेध व्यक्त केला असून जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा हे आमचे कर्तव्य असल्याचे विधान शरीफ यांनी केले होते.

तसेच भारताने जम्मू-काश्मीर संबंधित केलेले वक्तव्य निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी शांततेत आपले ठिकाण निवडले आहे. हे मला ऑगस्ट हाऊसच्या निर्दशनास आणून द्यायला आवडेल. त्यामुळे शरीफ यांनी केलेले हे विधान संपूर्णपणे निराधार असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे सचिव अभिषेक सिंग यांनी सांगितले.

शुक्रवारी ऱात्री संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेदरम्यान जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळवून देणे पाकिस्तानचे कर्तव्य असल्याचे सांगत यासाठी आपण काश्मीरला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे शरीफ म्हणाले होते. तसेच सचिव स्तरावरील बैठक रद्द करुन भारताने संधी दवडल्याचे म्हटले होते.

Leave a Comment