माजी महापौर मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर

shubha-raul
मुंबई : मनसेमध्ये शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी प्रवेश केला असून मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आल्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

दहिसर प्रभागात सर्वाधिक महिला उमेदवार असल्याने त्यांनी शिवसेनेकडे या प्रभागासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली म्हणूनही त्या नाराज होत्या. शिवाय घोसाळकर प्रकरणामुळे शिवसेनेत न्याय मिळाला नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

शिवसेनेचे आमदार घोसाळकर हे शिवसेनेच्याच नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप शुभा राऊळ यांनी केली होता. पक्षाच्या नेतृत्वानंही त्यांच्या या कैफियतीकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तेव्हापासून त्या नाराज होत्या.

Leave a Comment