ब्रेकअप के बाद शिवसेनेची पहिली प्रचारसभा

shivsena
मुंबई : शिवसेनेचा भाजपसोबतचा २५ वर्षाचा संसार तुटल्यानंतर आज मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्यानंतर आजच्या सभेतच पहिली प्रतिक्रिया देणार असल्याचे स्पष्ट केले असल्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल एक खाजगी वाहिनीवर मराठीच्या मुद्यावरुन शिवसेनेला झोबंतील अशी वक्तव्य केली आहेत. इतकच नाही तर आदित्य ठाकरेंच्या हट्टापायी युती तुटली असा आरोपही खडसेंनी केल्यामुळे भाजपच्या टीकेला उद्धव काय प्रत्युत्तर देणार हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, या सभेसाठी महालक्ष्मी रेसकोर्सवर जय्यत तयारी सुरु आहे. युती तुटल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच सभा असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Comment