भाजप देणार स्वाभिमानीला १८ जागा

raju-shetty
मुंबई : विधानसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासंदर्भातील माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

राजू शेट्टींनी अपेक्षित जागा मिळाल्याने आम्ही भाजपसोबत गेल्याचे स्पष्ट केले असून भाजप स्वाभिमानीला १८ जागा देणार असून पक्षाने सहा मतदारसंघ निश्चित केले आहेत. तर उरलेल्या जागांवर अजून चर्चा सुरु असल्याचेही शेट्टींनी सांगितले.

आपल्याला हव्या असलेल्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आधीपासूनच तयार असल्याचे त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Comment