उदय सामंतांनी सोडली राष्ट्रवादीची साथ

uday-samant
मुंबई – रत्नागिरीचे पालकमंत्री व विद्यमान नगरविकास मंत्री आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम राम ठोकला असून सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करणार आहेत.

मागील १० वर्षापासून सामंत हे आमदार असून मागील काही वर्षापासून त्यांच्याकडे नगरविकास या महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपदही होते. मात्र अनेक दिवसांपासून सामंत हे नाराज असल्यामुळे सामंत हे आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नाव असलेल्या उदय सामंत यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. तसेच सामंत यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीसमोर एका दिवसांत उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान आहे.

राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या उदय सामंत यांनी कार्य़कर्त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे समजते. सामंत हे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी दाखल करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

Leave a Comment