पृथ्वीबाबांच्या विरोधात कराडमधून उंडाळकरांना राष्ट्रवादीचे तिकीट?

vilaskaka
कराड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमधूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता आघाडी तुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असल्याचे दिसते. त्यासाठी मुख्यमंत्र्याच्या उमेदवारीला विरोध करणारे काँग्रेसचेच नेते विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीकडून साकडे घातले जात असल्याचे समजते.

उंडाळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते आहे. त्यामुळे दक्षिण कराडमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून विलासकाका उंडाळकर यांच्यात अटीतटीची लढत होईल असे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा दक्षिण कराडमध्येच अडकवून ठेवायचे व काहीही करून पराभूत करून राज्याचे मैदान मारायचे अशी रणनिती शरद पवार-अजित पवार हे काका-पुतणे ठरवू शकतात. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच पण आता काँग्रेसमधून भाजपात गेलेले अतुल भोसले हे भाजपचे उमेदवार असतील.

Leave a Comment