आठवले देणार मंत्रीपद देणाऱ्यांची साथ

ramdas
मुंबई – शिवसेना – भाजप युती अखेर तुटल्यानंतर आता महायुतीतील घटक पक्ष कोणाला साथ देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असून आज आपली भूमिका रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले स्पष्ट करणार आहेत.

जो कोणी मंत्री पद देईल त्यालाच रामदास आठवले यांचा पक्ष साथ देण्याची शक्यता आहे. भाजपला साथ देण्याच्या मोबदल्यात केंद्रात मंत्रिपद देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

याबाबत त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र भाजपकडून याविषयी प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, भाजप की शिवसनेसोबत जायचे याचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारूनचं घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Leave a Comment