
मुंबई: भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुंबई दौरा महायुतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला असून अमित शहा यांनी त्यांचा दौरा सेना-भाजप युती तुटणार असल्यामुळे रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. मात्र भाजपकडून अमित शहांचा दौरा रद्द झाला की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही.
भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द?
सकाळी १०.३० वाजता शहा मुंबईतील केशवसृष्टी या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र शहा यांचा दौरा रद्द झाल्याने महायुतीतला तिढा सुटण्याची शक्यता कमी असल्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुती टिकणार की तुटणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
