भारताची आणखी एका पदकाच्या दिशेने वाटचाल

deepika
इंचेऑन – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाने ‘ग्रुप बी’मध्ये बुधवारी दोन विजय नोंदवत जवळपास उपांत्य फेरीसह कांस्यपदक निश्चित केले आहे.

स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लिकल, जोश्ना चिनाप्पा यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम हॉँगकॉँगचा २-१ पराभव केला. विशेष म्हणजे यंदा एकेरीत कांस्यपदक जिंकलेल्या दीपिका पल्लिकलने सलामीची लढत गमावली होती. मात्र ०-१ पिछाडीतूनही जोश्ना चिनाप्पा आणि अ‍ॅनका अ‍ॅलनकॅमोनी यांनी नंतरच्या दोन एकेरी लढती जिंकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्ध सामने जिंकणा-या महिला संघाला किमान कांस्यपदकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गुरुवारी चीनविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.

त्यापाठोपाठ भारताच्या महिलांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-० सहज नमवले. त्यामध्ये दीपिका पल्लिकलला एकेरीची लढत जिंकून देण्यात यश आले.

Leave a Comment