काँग्रेसने जाहीर केली ११८ उमेदवारांची यादी

congress
मुंबई- महायुती आणि राज्यातील सत्तारूढ आघाडीतील जागावाटपावरचा तोडगा अद्यापी जाहीर झाला नसतानाच काँग्रेसचे आघाडी घेऊन आपल्या ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विेशेष म्हणजे राष्ट्रवादीशी कोणतीही चर्चा न करताच ही यादी जाहीर केली गेली आहे. महायुतीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असून त्यांची यादी आज म्हणजे शुक्रवारी सायंकाळपर्यंत जाहीर केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत बहुतेक उमेदवार कॉग्रेसच्या वाट्याला पूर्वी असलेल्या जागांवरचेच आहेत मात्र अगोदरच यादी जाहीर करून राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री चव्हाण कराडमधून लढत असून तेही काल जागावाटपाची चर्चा करण्याऐवजी आपल्या मतदारसंघात निघून गेल्याने राष्ट्रवादीचे नेते चिडले आहेत असेही समजते. पहिल्या यादीत लातूरसाठी अमित देशमुख, निलंग्यातून अशोक निलंगेकर यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून त्यांची पत्नी अमिता यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरून आहे तर परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. या दोन्ही जागांवरचे उमेदवार जाहीर केले गेलेले नाहीत.

महायुती घटक पक्ष नेते महादेव जानकर यांनी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे विधान केले आहे. महायुतीची पहिली यादी आज प्रसिद्ध केली जाईल असेही ते म्हणाले.

Leave a Comment