
मुंबई – महाराष्ट्रातील शिवसेनेसोबतची २५ वर्षं जुनी युती तोडण्याचा निर्णय अखेर भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत होऊ शकते.
भाजपच्या वरिष्ठांकडून शिवसेनेबरोबरची युती तोडण्याचा निर्णय
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आजही आपला मुंबई दौरा रद्द केला आहे. शिवसेनेसोबत आणखी वाटाघाटी करण्यात भाजपला रस नसल्याचं त्यातूनही अधोरेखित झाले आहे. ’आमच्या बाजूनं सगळं संपले आहे’, हे शिवसेनेला सुचवण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याचंही बोलले जात आहे. अर्थात, युती-महायुतीबाबतचा आत्तापर्यंतचा सावळागोंधळ बघता औपचारिक घोषणा होईपर्यंत काहीच सांगता येत नाही.
