आव्हाड यांची खोटे प्रतिज्ञापत्र प्रकरणी उच्च न्यायालयात धाव

awahad
मुंबई – मागील विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक लढवताना खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपांचा तपास करावा, या ठाणे महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एम. एल. टहलियानी यांच्यापुढे यावर प्राथमिक सुनावणी झाली.

आदर्श सोसायटीत सदनिका असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दडवून ठेवल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. याविषयी तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. याचिकेवर १ ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्‍चित केले. २००४ व २०१० मध्ये आदर्शसाठी सुमारे ६० लाखांची रक्कम जमा केली होती, असा आरोपही त्यांच्यावर आहे. ठाणे न्यायालयात माहिती अधिकाराचे कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी तक्रार केली आहे.

Leave a Comment