भाजपात डेरेदाखल विलासरावांचे जावई

atul-bhosale
मुंबई – काँग्रेसचे मातब्बर नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांनी मुंबईतील भाजपच्या कार्य़ालयात त्यांचा रितसर भाजप प्रवेश केला.

अतुल भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला आहे. तसेच दक्षिण कराडमधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अतुल भोसले हे निवडणूक लढणार असल्याचेही समजल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच दिसत आहे.

दक्षिण कराड मतदारसंघातून काका उंडाळकर यांनीही हक्क सांगितला आहे. तसे न झाल्यास बंडखोरी करण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत. त्यात आता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे जावई अतुल भोसलेंच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना तगडे आव्हान निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Leave a Comment