
मुंबई : केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. दिल्लीहून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते मुंबईकडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
केंद्र सरकारमधून बाहेर पडणार शिवसेना!
या आधी आमच्या सोबत येणाऱ्या घटकपक्षांसोबत आम्ही आहोत, भाजप आणि घटकपक्षमिळून आम्ही पुढच्या मार्गाला निघालो असल्याचे सांगून भाजप नेत्यांनी युती तुटल्याचे संकेत दिले. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजप शिवसेनेसोबत नसल्याचे सांगितले. मात्र आपण शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले, आता शिवसेनेच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
