घड्याळाने सोडली हाताची साथ

aagahdi
मुंबई – युतीच्या मागोमाग राज्यात १५ वर्षापासून असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आज फरकत झाली असून राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीची ताकद असतानाही कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना – भाजपा युती तुटल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यात असलेली आघाडी संपुष्टात आल्याने आता राज्यात चौरंगी निवडणूक लढत पाहायला मिळणार आहे.

विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत प्रबळ पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. २००९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ७१ जागा तर काँग्रेसला ६९ जागा मिळून सुध्दा राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यास कमीपणा मानला नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्याने काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

Leave a Comment