
तुळजापूर – आज दुपारी तुळजापूरात जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावर भगवा फडकू दे, असे साकडे उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानीला घातले.
उद्धव ठाकरेंने घातले तुळजाभवानीला साकडे
आज सकाळी १२ च्या सुमारास उद्धव ठाकरे तुळजापूरात दाखल झाले. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन ते दुपारी एकच्या सुमारास मंदिराकडे रवाना झाले. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान त्यांनी मनोभावे मां जगदंबा तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांनी त्यांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव यांनी फारसे बोलण्यास नकार दिला. युतीबाबत चर्चा सुरु आहे. मां तुळजाभवानी सर्व काही सुरळित पार पाडेल असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
