
मुंबई – तुम्हांला तुमची महत्त्वाची बँकांची कामे ही पुढील सप्ताहात सोमवार पूर्वीच करावी लागणार आहेत. अन्यथा पुढच्या महिन्यातच तेही ७ तारखेलाच ही कामे करता येणार आहेत. त्यामुळे त्वरा करा तुमची कामं या सप्ताहात नाही तर सोमवार पूर्वीच उरका !
२९ पूर्वी करा बँकेचे व्यवहार
३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी बॅंका अर्धवार्षिक कामकाजांमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे बॅंका ग्राहकांसाठी बंद असतात. तर २ ऑक्टेबरला गांधी जयंती, ३ ऑक्टोबरला दसरा आल्यामुळे बॅंकांना सुट्टी आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी शनिवार असल्याने सर्व बॅंका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ ऑक्टोबरला रविवार आल्याने आठवड्याची सुट्टी आहे.
मात्र बँका नियमितपणे सुरू झाल्यावरही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. तसेच बँकेचे इतरही कामे व्हायला वेळच लागणार आहे. तसेच २ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सुटया आल्याने एटीएममध्ये पैशांचा भरणा होणार नाही. दसरा लक्षात घेऊन ग्राहक मोठया प्रमाणात एटीएमवर गर्दी करू शकतात. त्यामुळे एटीएममध्येही खडखडाट राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
