भारत दौऱ्यासाठी इंडीज टीमची घोषणा, गेलची माघार

chris-gayle
नवी दिल्ली : आगामी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून जायबंदी झाल्यामुळे वेस्ट इंडीजचा आघाडीचा फलंदाज ख्रिस गेल याने माघार घेतली आहे.

कोचीत या मालिकेस येत्या आठ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून भारत दौऱयासाठी वेस्ट इंडीजचा संघ आज जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी ड्वेन ब्राव्हो याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतात खेळण्याचा अनुभव असलेला जलदगती गोलंदाज जेरोम टेलर याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

वेस्ट इंडीज संघ पुढीलप्रमाणे : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, लिऑन जॉन्सन, दिनेश रामदीन (यष्टीरक्षक), रमी रामपॉल, किमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सामी, मार्लेन सॅम्युअल, लिडन सिमन्स, ड्वेन स्मित आणि जेरोम टेलर.

Leave a Comment