ई-निविदा घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे ९ अभियंते निलंबित

bmc
मुंबई – मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुंबई महापालिकेतील १०० कोटी रुपयांच्या ई-निविदा घोटाळ्याप्रकरणी सभागृहात कबुली दिल्यामुळे यात गुंतलेल्या २३ अभियंत्यांपैकी ९ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून, ४० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्याची माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक चौकशीत २२ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये घोटाळा दिसत असला, तरी प्रत्यक्षात यांपैकी साडेसहा कोटींचाच गैरव्यवहार झाल्याचे कुंटे म्हणाले.

ई-निविदा प्रकरणात कंत्राटदारांचे भले करण्यासाठी अभियंत्यांनी नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबवल्याने १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला होता. यावरून गेले आठ दिवस पालिकेतील वातावरण तापले आहे.

Leave a Comment