आता लहानग्यांचीही बँकेत खाते

icici
मुंबई – १० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुला-मुलींचेही बचत खाते उघडण्यास खासगी क्षेत्रातील नामांकित आयसीआयसीआय बँकेने सुरुवात केली असून खाते उघडल्यानंतर त्याला चेकबूक आणि डेबिट कार्डही दिले जाणार असून, ज्यावर त्याच्या आवडीचे चित्र असणार आहे.

आम्ही स्मार्ट स्टार खात्यांची सुरुवात करून खूश आहोत. यामध्ये बालकांना स्वतंत्र खात्याद्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. याद्वारे लहानग्यांना बचत आणि पैसा खर्च करण्याची समज येण्यास मदत होईल. बचत खात्यांच्या माध्यमातून या मुलांना विविध बँकांचे देवघेव, चेकबूक जारी करणे, विविध बिल भरणे, मोबाईल रिचार्ज इत्यादी सुविधा मिळतील. त्याचबरोबर एटीएम, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग करता येऊ शकते, बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सबरवाल यांनी सांगितले.

Leave a Comment