आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे अजून एक कांस्यपदक

asian-game
इंचेऑन : भारतीय रोइंगपटू दुष्यांत दुसियान याने आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्रीडाप्रकारात कांस्यपदक पटकावले.

दुष्यंतने भारताला स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पहिले पदक मिळवून दिले असून दुष्यंतला पुरुषांच्या सिंगल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याची संधी होती. परंतू, त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शर्यतीत अर्धे अंतर पार करेपर्यंत दुष्यंत आघाडीवर होता. मात्र, त्याला आघाडी टिकविता आली नाही. अखेर २००० मीटर शर्यतीत तो ७ मि. २६.५७ सेकंद वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानावर राहिला.

या स्पर्धेत हाँगकाँगच्या कुवान होई लोक याने ७ मि. २५.०४ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. तर, दक्षिण कोरियाच्या हाकबिओम ली याने ७ मि. २५.९५ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळविले.

Leave a Comment