अमेरिकेतील न्यायालयाने लादेनच्या जावयाला ठोठावली शिक्षा

gaitha
वॉशिंग्टन – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबू गायथ याला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अल कायदा या दशहशतवादी संघटनेने ११ सप्टेंबर २०११ रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली गायथला फेब्रुवारी महिन्यात अटक करून त्याच्यावर मेनहट्टन फेडरल न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. तीन आठवडे सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने त्याला दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याची परदेशातील व घरातील सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment