राष्ट्रवादीने मागितले अडीच वर्षसाठी मुख्यमंत्रीपद

narayan-rane
मुंबई : राष्ट्रवादीने काँग्रेससमोर आज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकीत जागावाटपाबाबत नवा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी यामध्ये राष्ट्रवादीने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले.

काँग्रेसने राष्ट्रवादीने मागितलेल्या १२४ जागांचा प्रस्ताव धुडकावला होता. त्यानंतर आज सकाळी पार पडलेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. आता रात्री पुन्हा एकदा आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

आघाडीमध्ये आजपर्यंत ‘ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री’ असे ठरले असता, राष्ट्रवादीच्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. यापूर्वी २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काँग्रेसपेक्षा तीन जागा जास्त असूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तडजोडीस मान्यता दिली होती.

Leave a Comment