अखेर शिवसेना तडजोडीस तयार

shivsena1
मुंबई – शिवसेना-भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून जागा वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेनेने काही जागांवर तडजोड करण्यास तयारी दर्शवल्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

काही जागांवर शिवसेना तडजोड करणार असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. उद्या सकाळी दोन्ही पक्षांचे नेते पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच उद्याच शिवसेना आणि भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आणि भाजप नेत्यांमध्ये मुंबईत चर्चा झाली. यावेळी भाजपने नविन प्रस्ताव मांडला. शिवसेनेला १५१ जागा, भाजपला १२५ आणि घटकपक्षांना १२ जागांचा हा प्रस्ताव आहे.

दरम्यान, रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांनी केंद्रात मंत्रीपद द्यावा असा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आले आहे. यासाठी शिवसेना स्वत:च्या मंत्रीपदाचा त्याग करण्यासही तयार आहे. आमचे मंत्री पद घ्या पण या दोघांना न्याय द्या असे शिवसेनेने म्हटले आहे.

Leave a Comment