युती तुटण्याचे खापर आदित्य ठाकरेवर!

aadity
मुंबई – शिवसेनेकडून नवख्या आदित्य ठाकरेंना युतीच्या जागावाटपाबाबत भाजपचे राज्य प्रभारी ओम माथूर यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याशी चर्चा करण्याकरता पुढे करण्यात आले. मात्र शिवसेनेचा हा स्वभाव भाजपला रुचलेला नाही. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने हा भाजपचा अपमान असल्याचे सांगितले.

या नेत्याने उद्या आदित्यच्या लहान भावाशीही आम्हाला चर्चा करावी लागेल, अशी कोपरखळीही शिवसेनेला मारली. युती तुटण्याची पहिली ठिणगी तिथेच पडल्याचेही भाजपच्या नेत्याने सांगितले.

अदित्य ठाकरे हे अगदीच अपरिपक्व आहेत. त्यांना अजून राजकारणाची जाण नाही. अशा स्थितीत देशपातळीवरील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून पाठवले जाते, हा प्रकार म्हणजे भाजपची चेष्टा करण्याचाच एक भाग आहे, असेही भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Leave a Comment