
सांगली – शेतकरी संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीत कंबर कसली असून ही संघटना राज्यभरात १०० जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सांगलीत एका बैठकी दरम्यान ही घोषणा केली.
शेतकरी संघटनेने कसली कंबर; लढवणार १०० जागा
तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाराजांची मदत घेवून जिल्ह्यातील आठही मतदार संघात उमेदवार उभे करणार असल्याचेही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितले
काँग्रेस आणि महायुती यांना पर्याय देण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी उभारणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
