मनसेची ‘ब्लु प्रिंट’ साधणार घटस्थापनेचा मुहूर्त

mns
मुंबई – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी बनविलेल्या बहुचर्चित ‘ब्लु प्रिंट’ची प्रतिक्षा अखेर संपली असून मनसेच्या ‘ब्लु प्रिंट’चे घटस्थापनेच्या मुहुर्तावर सादरीकरण होणार आहे.

गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते ही ‘ब्लु प्रिंट’ सादर करण्यात येणार आहे.

राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासूनच राज्याचा विकास करण्यासाठीच ब्लू प्रिंट आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. मात्र, पाच वर्षे झाली तरी राज ठाकरे यांनी आपली ‘ब्लु प्रिंट’ सादर केलेली नाही. यामुळे सगळ्यांनाच या ‘ब्लु प्रिंट’ ची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत सपाटुन मार खाणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत या ‘ब्लु प्रिंट’चा कितपत फायदा होतो. तसेच ही ‘ब्लु प्रिंट’ मतदारांना प्रभावीत करेल का? हे देखील निवडणुकीत स्पष्ट होईल.

ब्लू प्रिंट मधील महत्वाचे मुद्दे
१) रस्ते व्यवस्थापन २) पाणी व्यवस्थापन ३) वीज व्यवस्थापन ४) आरोग्य आणि स्वच्छता ५) रोजगार ६) ग्रामविकास ७) महिला सक्षमीकरण ८) महिला सुरक्षा ९) शिक्षण १०) औद्योगिक विकास ११) टोल धोरण

Leave a Comment