
औरंगाबाद – महाराष्ट्रातील विधानसभेसाठीचे प्रचार प्रमुख आणि प्रभारी म्हणून काम करत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस त्यांची पहिली उमेदवार यादी घटस्थापनेला म्हणजे २५ सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकरांशी बोलताना राणे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची बोलणी अद्यापीही सुरू आहेत. आम्हाला आघाडी हवी आहेच पण तरीही आमची पहिली यादी २५ सप्टेंबरला जाहीर केली जाईल. राष्ट्रवादीला १२४ जागा देण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसची पहिली यादी २५ सप्टेंबरला – नारायण राणे
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की जो माणूस आपल्या जवळच्या लोकांशीही व्यवस्थित बोलू शकत नाही तो मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असूच शकत नाही. मोदी लाटेविषयी बोलताना ते म्हणाले की मोदी जर लाट असतील तर आम्ही समुद्र आहोत. लाटा येतात, जातात. समुद्र मात्र कायमचा असतो. राज्यात आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या काळात शेतकर्यांसाठी अच्छे दिन आलेच नाहीत असे सांगून त्यांनी युतीने निवडणुकांत दिलेली आश्वासने पाळली नसल्याची टीकाही केली.
