वॉशिंग्टनला मोदींचा मुक्काम ब्लेअर हाऊसमध्ये

blair
वॉशिंग्टन- भारताचे पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन भेटीत प्रेसिडेंट गेस्ट हाऊस ब्लेअर हाऊसमध्ये मुक्काम करणार आहेत. गेल्या दोन दशकांत भारतीय पंतप्रधानांनी या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी या गेस्ट हाऊसमध्ये राहिले होते मात्र मनमोहनसिंग कधीच येथे राहिले नाहीत असेही समजते.

१९० वर्षांपूर्वीचे हे गेस्टहाऊस प्रथम खासगी निवासस्थान म्हणूनच बांधले गेले होते. दुसर्‍या जागतिक युद्धानंतर अमेरिकन सरकारने ते खरेदी केले व त्यानंतर ते अमेरिकन अध्यक्षांचे गेस्ट हाऊस म्हणून वापरले जात आहे. हे गेस्टहाऊस अमेरिकन राजकारण, डिप्लोमसी व संस्कृतीचा इतिहास बनून राहिले आहे. अँड्रू जॅकसनच्या किचन कॅबिनेटपासून ते अब्राहिम लिंकन यांच्या खासगी गप्पांपर्यंत तसेच हॅरि ट्रूमन यांच्या दुसरे जागतिक युद्ध संपल्यानंतरच्या कुशल नेतृत्त्वापासून ते कोल्ड वॉरच्या सुरवातीपर्यंत अनेक गोष्टींचे साक्षी असलेले हे गेस्टहाऊस अमेरिकेच्या अतिमहत्वाच्या विदेश नितीचे हत्यार म्हणून वापरले जात आहे.

मोदी वॉशिंग्टन भेटीत या गेस्टहाऊसमध्ये राहणार असले तरी न्यूयॉर्कमध्ये मात्र ते न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्येच मुक्काम करणार आहेत.

Leave a Comment